Home Cities जळगाव राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय,जळगाव यांच्या समन्वयाने मेरा युवा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व NCC यांच्या सहकार्याने दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.या रॅलीत मेरा युवा भारतचे, एन सी सी व एन एस एस चे स्वयंसेवक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

मतदार जागृती रॅली सकाळी 11.00 वाजता जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथून सुरू होऊन बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे समाप्त होणार आहे.या रॅलीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क, लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व तसेच युवक व नागरिकांमध्ये मतदार जनजागृती करण्याचा उद्देश आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मतदार जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करता येईल.


Protected Content

Play sound