धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी आज शहरातील प.रा.विद्यालयातील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. आपल्या देशाला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आज शहरातील प.रा.विद्यालयातील मतदान केंद्रात महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी मतदान केले. यावेळी मतदान करत आपण देशाची स्वप्नं आणि अपेक्षा पूर्ण करण्यात आपले योगदान देण्याचे काम करतो. आपण सर्वांनी एक असे वातावरण तयार करुयात जिथे सर्व धर्मसमभाव राहील. यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन देखील श्री.पाटील यांनी केले.