Home राजकीय मला मतदान करा नाहीतर… ; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी

मला मतदान करा नाहीतर… ; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी


maneka gandhi
 

सुलतानपूर (वृत्तसंस्था) तुम्ही मत द्या किंवा देऊ नका मात्र, मी जिंकून येणार याची मला खात्री आहे. त्यामुळे मत दिले नाहीत तर जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा मलाही विचार करावा लागेल, अशी उघडउघड धमकी भाजपा खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान देत असल्याचे समोर आले आहे.

 

केंद्रीय मंत्री असलेल्या मेनका गांधी सुलतानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मुस्लिमबहुल तुराबखानी भागातील प्रचारसभेत त्यांनी उपस्थितांना जवळपास धमकीच दिली. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही खुल्या मनाने आलो आहोत. उद्या तुम्हाला माझी गरज लागेल. त्यामुळे तुम्ही आताच पाया रचून ठेवा. हीच योग्य वेळ आहे. मी जिंकणार हे नक्की आहे, लोकांची मला मदत होते आहे. मात्र माझा विजय मुस्लिम मतांशिवाय झाला तर मला फार काही चांगले वाटणार नाही. मी कुठेतरी खट्टू होईन. जेव्हा मुस्लिम बांधव माझ्या दारात मदत मागायला येतील तेव्हा मलाही त्यांचा विचार करावा लागेल, अशा शब्दांमध्ये मेनकांनी मुस्लिमांना धमकावले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound