हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीला कौल द्या : चित्रा वाघ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाडक्या बहिणींसह सर्वांनीच हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी महायुतीला मतदान करावे असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आ. चित्राताई वाघ यांनी केले. त्या महायुतीचे उमेदवार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होत्या.

राज्यातील महायुती शासनाने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे मदत दिली ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पोटात सूड उठलेत म्हणून कोर्टात ही गेलेत मात्र त्यांनी कितीही स्टंटबाजी केली आणि तिथेही दिशाभूल केली तरी लाडक्या बहिणीचे पैसे कधीही बंद होणार नाहीत. उलट महायुती शासन सत्तेत आल्यावर आता 2100 रुपये प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याचा संकल्प महायुतीने घेतलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणी या महायुती शासनाच्या पाठीशी उभे राहतील असा आत्मविश्वास आमदार चित्रा ताई वाघ यांनी यावल येथे श्री स्वामीनारायण मंदिराच्या पटांगणात आयोजित लाडक्या बहिणीच्या समोर चर्चेत यावल रावेर विधानसभेचे उमेदवार अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ संबोधित करताना त्यांनी आवाहन केले.

याप्रसंगी आमदार वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीतील आमचे सावत्र भाऊ तर बहिणीच्या वाईटावर बसलेले आहेत मात्र आमच्या बारामतीच्या मोठ्या ताई संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे या लाडक्या बहिणीच्या विरोधात बोलतात आणि सावत्र भाऊ खोट्यांचा सरदार राहुल गांधी मात्र आम्ही जे 2100 रुपये लाडक्या बहिणींना महायुती देणार आहोत तीच किंमत ते 3000 रुपये पर महिन्याला देऊ असे आवाहन करतात. मात्र हे पैसे कुठून आणणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्र चे तिजोरी खाली झाली आहे असं म्हणणारे मात्र आता तीन हजार रुपये देऊ असे खोटे आश्वासन देतात म्हणून या खोटारड्यांना घरचा रस्ता दाखवा.

आमदार चित्राताई पुढे बोलल्या की, महाविकास आघाडीच्या लोकांनी मुस्लिमांची मतं पाहिजे असतील तर त्यांनी सतरा मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या असून मान्य करा आणि त्याच्यावरती त्यांनी मान्यता ही दिली सर्व हिंदू माता बंधू भगिनींनी एकत्रित येऊन येणाऱ्या 20 तारखेला मतदानासाठी घरातील काम धंदा सोडून अगोदर आपला हक्क बजावा मतदान केलं तरच हिंदुत्व वाढेल हे लक्षात ठेवा असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र फडके, डॉक्टर केतकी पाटील यांनी सभेला संबोधित केले. तर प्रारंभी सात बालिकांचे पूजन यावेळी करण्यात आले सभेला मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या अरविंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उमेश फेगडे तालुका भाजपा अध्यक्ष यांनी मानले.

Protected Content