Home Cities पारोळा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पारोळा तहसीलदारांना निवेदन 

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पारोळा तहसीलदारांना निवेदन 


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेतर्फे राज्यभरात निवेदन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून त्याअंतर्गत पारोळा येथे तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि वृत्तपत्र क्षेत्रात निर्भीडपणे कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने दि. २५ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुका शाखेतर्फे तहसील कार्यालयात जाऊन स्थानिक प्रशासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडे वेधण्यात आले.

तालुकाध्यक्ष भूपेंद्र मराठे यांनी नायब तहसीलदार अश्विनी मराठे यांना हे निवेदन सुपूर्द केले. यावेळी संजय पाटील, रमेश जैन, अशोक लालवानी, राकेश शिंदे, प्रतीक मराठे, प्रकाश पाटील, बाळू पाटील, मच्छिंद्र शेलार आणि विशाल महाजन यांची उपस्थिती होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या हक्कांसाठी ठोस भूमिका मांडत प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निवेदनामध्ये वृत्तपत्र व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्यासाठी आठ महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पत्रकारांच्या कामकाजातील अडथळे, सुरक्षा, सुविधा आणि मान्यता यासंबंधीच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच सलग दहा वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती सदस्य म्हणून घोषित करण्यात यावे, ही महत्त्वाची मागणीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound