जिओ, एअरटेलसह वोडाफोनच्याही अनलिमिटेड कॉम्बो प्रीपेड प्लान

Vodafones

नवी दिल्ली वृत्तसंस्था । रिलायन्स जिओ आणि एअरटेल सध्या दूरसंचार क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहेत. या स्पर्धेत वोडाफोन आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असून वोडाफोनने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनलिमिटेड कॉम्बो प्रीपेड प्लान आणले आहे.

या प्रीपेड प्लानमध्ये डेटा, व्हॉइल कॉल आणि एसएमएससारख्या सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. वोडाफोनने ३०० रुपयांपर्यंतचे कॉम्बो पॅक ग्राहकांसाठी आणले आहेत. वोडाफोनकडे १५० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले दोन प्रीपेड प्लान आहेत. यात १२९ रुपये व १३९ रुपयांचे हे डेटा पॅक आहेत. या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत अनलिमीटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळणार आहे. १२९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा तर, १३९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. २०० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले दोन प्रीपेड प्लान युजर्सना कंपनीनं ऑफर केले आहेत. १६९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी आणि रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. तर, १६९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी १.५ जीबी डेटा मिळणार आहे. याचबरोबर अलिमीटेड कॉलिंगसह रोज १०० फ्री एसएमएस मिळणार आहेत.

वोडाफोनकडं २५० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले चार डेटा प्लान आहेत. यात २०५ आणि २२५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना जास्त व्हॅलिडिटी मिळते तर, २०९ आणि २९९ रुपयांच्या प्लानमध्ये जास्त डेटा ग्राहकांना दिला आहे. २०५ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमीटेड कॉलिंग आणि ३५ दिवसांसाठी २ जीबी डेटा व ६०० फ्री एसएमएससाठी देण्यात आले आहेत. २२५ रुपयांच्या या प्लानमध्ये ४८ दिवसांची व्हॅलिडिटीसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ४ जीबी डेटा मिळणार आहे. दरम्यान, २०९ आणि २२९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत अनलिमीटेड कॉलिंग आणि प्रति दिन १०० एसएमएस मिळणार आहेत. तर, २०९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज दीड जीबी आणि २२९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे.

Protected Content