जळगाव (प्रतिनिधी) शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघूर धरणातील साठा फक्त 20 टक्क्यांवर आल्याने येथे तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. अशा स्थितीतही महापालिका प्रशासनाकडून पाणी गळतीकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील विवेकानंद नगरात उघडकीस आला आहे. याठिकाणी आज सकाळपासून पाणी गळती सुरु असून हजारो लिटर पाणी वाया जातेय. दुसरीकडे मनपा प्रशासन मात्र, ‘पाणी गळती आज सुरूच राहील, उद्या दुरुस्ती करू’, असे बेजबाबदार उत्तर देत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवलेल्या जळगावात पाणी टंचाईचे संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. तरी देखील मनपा प्रशासन पाणी गळती व चोरीकडे लक्ष देत नाहीय. भर उन्हाळ्यात पाणी गळतीकडे लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजेपासून विवेकानंद नगर परिसरातील साईबाबा मंदीराजवळ पाणी गळती सुरु आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने मनपा पाणी पुरवठा विभागातील सोम पाटील नामक कर्मचारी यांना माहिती दिली असता,त्यांनी आज दुरुस्ती होणार नाही,उद्या करू, असे बेजबाबदार उत्तर दिले. यानंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख डी.एस.खडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गळती रोखतो. परंतु नेमकी गळती कधी रोखली जाईल,याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. दरम्यान, शहराला एकीकडे तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असतांना अधिकारी व कर्मचारी बेजाबदारपणे उत्तर देत पाणी गळतीकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे जळगावकरांमधून संताप व्यक्त होतोय.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/402897160291575/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1089686914551148/
Perfect Channel for live status in jalgaons news… Nice job wasim bhai. Best Wishesh…