डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार विवक फणसळकर यांच्याकडे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील डीजीपी निवडीसाठी मुख्य सचिवांना ०५ नोव्हेंबर २०२४ (दुपारी १.०० वाजता) पर्यंत वेळ देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आयपीएस अधिका-यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर आता विवेक फणसळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.

Protected Content