फैजपूर, प्रतिनिधी | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत रावेर तालुक्यातील कुसुंबा गावातील विवेक महाजन उत्तीर्ण झाले आहेत.
२३ जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत धनाजी नाना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले रावेर तालुक्यातील कुसुंबा गावातील प्रा. विवेक महाजन यांनी सेट परीक्षेत यश सपांदन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थाअध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी तसेच प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण, प्रा.डॉ. आर.एस. ठाकरे, प्रा. एन. आर. वाघोदे, प्रा. व्ही. एल .कोष्टी, विलास ताठे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर महाजन, सावखेडासह रावेर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. ते कुसूंबा गावातील विकास सोसायटीचे माजी चेअरमन रमेश किसन महाजन (घोडके) यांचे चिरंजीव आहेत.