जळगाव प्रतिनिधी । सेवक सेवाभावी संस्था जळगाव कडून कोरोना महामारी कार्य करणारे समाजसेवक विवेक महाजन यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
जळगाव मधील रक्तवीर समाजसेवक विवेक महाजन यांना सेवक सेवाभावी संस्था जळगाव कडून महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना संस्थेच्या कार्यालयात संस्थाध्यक्ष विशाल शर्मा यांच्या हस्ते देण्यात आले. सन्मान करताना राष्ट्रीय हिंदु सुरक्षा सेना जिल्हाध्यक्ष मयूर बारी व इतर पदाधिकारी प्रदीप सोनार, सोपान मानकर, कुलदीप बुवा, अमित अग्रवाल, निलेश वाणी, हेमंत वडनेरे यांची उपस्थिती होती.