जळगाव प्रतिनिधी । उकई ता. तापी गुजरात येथील सासर आणि जळगाव येथील माहेर असलेल्या 31 वर्षी विवाहितेचा दोन मुली झाल्याने आणि अडीच लाख रूपये माहेरहुन आणावे यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांवर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परीसरातील नामदेव नगरातील वर्षा संतोष पाटील वय-31 रा. सोनगड ता.जि.तपी गजराथ ह.मु. नामदेव नगर, पिंप्राळा शिवार यांचे संतोष मनिलाल पाटील रा. सोनगड, उकई जि. तापी गुजरात यांच्याशी मार्च 2008 मध्ये लग्न झाले होते. सुरूवातीचे पहिले अडीच वर्ष सुरळीत संसार चालला. त्याच्या संसाररूपी वेलीली दोन कन्या देखील झाल्या. मात्र दोन मुलीच झाल्या असा मानसिक छळ पतीसह सासु, सासरे यांनी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सोन्याची साखळी व इतर वस्तू घेण्यासाठी माहेरहून 2 लाख 5 हजार रूपये माहेरहून आणावे अशी मागणी करू लागले. याला विरोध केला असता शिवीगाळ, शारिरीक त्रास देण्यास सुरूवात केली. दरम्याने गेल्या दोन वर्षांपासून पिडीत विवाहिता अपल्या दोन मुलींसह वडीलांकडे माहेरी निघून आल्या. एवढयावरच गप्प न राहता फोनवरून सतत मानसिक त्रास आणि शिवीगाळ करत होते. आणि सासरच्या मंडळींनी माहेरी येवून 7 वर्षाच्या मोठ्या मुलीला भांडण करून सासरी घेवून गेले. तसेच दोन्ही मुलींसह जिवे ठार मारण्याची धमकी देण्यास सुरूवात केली सासरच्या मंडळीचा सततचा मानसिक त्रास सहन न झाल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात पती संतोष मनीलाल पाटील, सासु बन्सबाई मनीलाल पाटील, सासरा मनिलाल रामचंद्र पाटील, नणंद संगिता सचिन गुरखा, नंदोई सचिन शंकर गुरखा, मामसासरे सोपान यादव पाटील सर्व रा. उकाई गुजराथ, मावससासरे गंगाराम पाटील रा. आव्हाणे ता.जि.जळगाव अशा सात जणांवर विवाहितेचा मानसिक, शारिरीक छळ व मुलींसह जीवेठार मरण्याची धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. शिंदे करीत आहे.