पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंढरपूरमधून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या २ जूनपासून पंढरपूरमधील विठ्ठल रूक्मिणीचे मंदिर दर्शनासाठी सुरू होणार आहे. ही माहिती मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ औसेकर यांनी दिली आहे. गेल्या १५ मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचे चरण स्पर्श दर्शन बंद होते.
अनेक दिवसांपासून मंदिरांच्या गाभाऱ्याचे काम सुरू होते. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद होते. हे काम पुढेही 17-18 महिने हे काम सुरु राहणार आहे. पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होईल.