Home धर्म-समाज विठ्ठल-रुक्मिणी पूजेची ऑनलाईन बुकिंग होणार

विठ्ठल-रुक्मिणी पूजेची ऑनलाईन बुकिंग होणार


पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. याची लवकरच ऑनलाइन पद्धतीने पूजेची नोंदणी सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याबाबत मंदिर समितीच्या २० ऑगस्ट रोजी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील सभेत निर्णय घेण्यात आला होता.

भाविकांना पूजेची नोंदणी https: www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. भाविकांना अल्प देणगी मूल्य आकारून विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजांचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. याबाबतची संगणक प्रणाली विकसित झाली असून चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत काम पूर्ण होऊन १ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound