चोपडा प्रतिनिधी– ताालक्यातील विटनेर येथे बस स्टँड समोर चमेलाबाई भोजू शिंदे या गरीब महिलेच्या घराभोवती अतिक्रमणाचा विळखा पडला असून याला हटविण्याची मागणी होत आहे.
चमेलाबाई भोजू शिंदे या येथे गत अनेक वर्षांपासून राहत आहेत. घरात त्या आणि त्यांचा दिव्यांग मुलगा नंदलाल राहतो. ते शेळी पालन करून पोट भरतात. त्यांचे घर १२ बाय ४५ चौरस फूटाचे असून यापैकी ओट्यासमोरच्या जागेत बकर्या बांधतात. बाजूला १२ बाय २०जागेवर त्याच्या मोठ्या मूलास शासकिय घरकूलही मिळाले आहे. या दोन्ही घरांसमोर मरिआईचे मंदिर मंदिराला लागून दोन्ही बाजूस वापराचा पूर्ण मोकळा रस्त्यावर मरिआईच्या मंदिरासाठी तीन फूट जास्तिचे बेकायदेशीर बांधकाम केले जात असून आजूबाजूला टपर्यांचा विळखा पडला आहे. यामुळे घरासमोरच्या एकूण २४फूट रूदीच्या जागेवर रस्त्याला लागून अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.. त्यामूळे एक फुटाचाही रस्ता वापरासाठी टपरीधारक व मंदिरवाल्यांना ठेवलेला नाही. याबाबत विचारणा केली असता टपरीवाले जुमानत नाहीत, तर सरपंच लक्ष देत नाहीत. तर मंदिराबाबत बोलणेही गुन्हा आहे. याची ग्रामसेवक दखल घेत नाहीत. गावात चमेलाबाईंचे एकटे घर असलेने त्यांची बाजू घेण्यास सज्जन लोक दचकतात तेव्हा अनूसूचित जातीच्या या विधवा वयोवृद्ध महिलेचा असाही प्रश्न आहे की, एखादी मृत्यूसारखी दुर्घटना घडली तर…मृतदेह कसा काढतील ? तरी ग्रामपंचायत प्रशासन, तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती वा पोलीस खाते यांनी या प्रकरणी लक्ष घालून वापराचा रस्ता मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. लालबावटा शेतमजूर यूनियनचे नेते कॉ अमृतराव महाजन यांनी ही वयोवृद्ध महिला व दिव्यांग तरूणाची बाजू लावून धरली आहे.