Home Cities जळगाव विष्णू भंगाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

विष्णू भंगाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

0
160

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे पत्रक देखील जारी केले आहे.

यासंदर्भातील वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जळगावच्या कार्यकारणीत धुसफूस असल्याचे या आधीच दिसून आले होते. जळगाव आतून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी तीन ते चार उमेदवार प्रयत्नशील होते. यात माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांनी बाजी मारल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. यामुळे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बंडखोरी करत स्वतः अपक्ष अपक्ष उमेदवारी केली.

यानंतर आज विष्णू भंगाळे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. थोड्याच वेळात ते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे.


Protected Content

Play sound