Home Cities जळगाव जळगावात २९ मार्चला ‘विशाल हिंदू मेळावा’; समाज एकत्रीकरणासाठी श्रद्धा कॉलनीत भव्य आयोजन

जळगावात २९ मार्चला ‘विशाल हिंदू मेळावा’; समाज एकत्रीकरणासाठी श्रद्धा कॉलनीत भव्य आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात येत्या २९ मार्च २०२६ रोजी ‘विशाल हिंदू मेळावा’ आयोजित करण्यात आला असून, या भव्य कार्यक्रमाच्या तयारीला शहरात वेग आला आहे.

सकल हिंदू समाज आणि श्रद्धा कॉलनी परिसरातील विविध सोसायट्यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. समाजात एकात्मता आणि बंधुभाव वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, विविध भागांतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख (रा. स्व. संघ) तसेच गुरुकृपा क्लासेसचे संचालक श्री. मनोजजी सावंत हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या भाषणातून हिंदू समाजाच्या संघटनात्मक बळकटी, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जपणुकीवर विशेष प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच, ह.भ.प. श्री. विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचनही उपस्थितांना लाभणार आहे.

रामानंद नगर परिसरातील चर्च रोडवरील श्री गणेश मंदिर परिसर, गजानन सोसायटी आणि पारिजात संकुल परिसरात हा मेळावा पार पडणार आहे. रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होईल. गजानन सोसायटी, पार्वती नगर, रामानंद नगर आदी परिसरातील नागरिक या आयोजनात सक्रिय सहभाग घेत असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, एकजूट आणि सांस्कृतिक बळकटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हा मेळावा केवळ धार्मिक न राहता सामाजिक जागरूकतेचा आणि संघटनात्मक एकतेचा संदेश देणारा ठरणार आहे.


Protected Content

Play sound