जळगाव प्रतिनीधी । विष प्राशन केल्याने गेल्या १२ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा गुरुवारी रात्री जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबुलाल मोहन चव्हाण (६०, रा. टाकळी, ता.मुक्ताईनगर) यांनी विष प्राशन केल्याने त्यांच्यावर २३ नोव्हेंबरपासून उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती काहीसी सुधारत असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा विसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.