जळगाव प्रतिनिधी । मोहाडी येथील एका 47 वर्षीय प्रौढाने घरातील पिक फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, अभिमन राजाराम चौधरी वय 47 रा. मोहाडी ता. जामनेर यांनी 16 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घरात असलेले पीक फवारणीचे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी मृत घोषित केले. सीएमो डॉक्टर अजय सोनवणे यांच्या खबरीवरून जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहे