पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवसेंदिवस पाचोरा शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालले आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शॉपींग कॉम्प्लेक्ससमोर मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी ९ वाजेपासून मध्यवर्ती भागात वाढलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग आणि पोलीस पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शॉपींग कॉम्प्लेक्ससमोर मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार १६ फेब्रुवारी रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कै.के.एम.बापु पाटील, भाजी मंडई कॉम्प्लेस जवळील अवैध धंदे सुरू असलेले अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढल्यानंतर भविष्यात पुन्हा अतिक्रमण होवु नये म्हणुन नगरपालिका याठिकाणी कम्पांऊड करणार आहे. जेणेकरून याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही. तसेच याठिकाणी शॉपींग कॉम्प्लेक्स करीता पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अतिक्रमण काढल्यानंतर भविष्यात पुन्हा अतिक्रमण होवु नये म्हणुन नगरपालिका याठिकाणी कम्पांऊड करणार आहे. जेणेकरून याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही. तसेच याठिकाणी शाशॉपींग कॉम्प्लेक्स करीता पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या अतिक्रमण मोहिमेत मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर निरीक्षक दगडु मराठे यांचेसह २५ ते ३० नगरपालिकेचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. अतिक्रमण काढतांना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पाचोरा पोलिस स्टेशनचे दोन सहाय्यक फौजदार यांचेसह ९ पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.