यावल येथे लॉकडाऊनचे उल्लंघन : ग्राहकांसह दुकानदारास दंड

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील सर्व भागात लॉकडाउनचे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, यावल येथील मुख्य बाजारपेठेतील काही रेडीमेड कापड विक्रेत्यांसह इतर व्यापाऱ्यांनी बाहेरुन दुकाने बंद करुन आतून दुकान सुरु ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळताच ग्राहकासह दुकानदारास पाच हजाराचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

कोरोना विषाणु संसर्गाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जळगाव जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊनचे निर्बंध लावल्याने या काळात जिल्हाधिकारी यांनी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेश दिले असुन या नियमावलीनुसार किराणा व आदी व्यवसायीकांसाठी सकाळी ७ते ११ वाजे पर्यंत नागरीकांसाठी जिवनावश्यक वस्तुची आपली दुकाने सुरू ठेवावी अशा सुचना देण्यात आल्या असुन, या सुचनांचे काही रेडीमेड कापड विक्रेते व आदी अनावश्यक व्यापारी आपली दुकाने बाहेरून बंद करून आतुन सुरू ठेवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत असुन असाच एक प्रकार आज यावल शहरातील मेन रोड वरील मुख्य बाजार पेठेतील एका कापड दुकानात घडला आहे.

जीवनावश्यक वस्तुच्या दुकानांसहअन्य दुकानानां परवानगी नाही शनिवारी सकाळी येथील मुख्य रस्त्यावरील रुपकला साडी सेंटरच्या दुकानाचे शटर बाहेरून बंद तर आतून दुकानदारी सुरूअसल्याचे पोलीसांना माहित पडल्यावरून पोलीसांनी दुकानात प्रवेश केला असता सुमारे २५-३० ग्राहकांना खरेदी करतांना पाहुन पोलीस अचंबीत झाले. यावेळी पोलीसांनी दुकानदारासह २५ जणांना

प्रत्येकी दोनशे रुपये दंडाप्रमाणे पाच हजार रुपयाचा पोलीसांनी दंड वसुल केला आहे. मात्र अनेक ठिकाणी अशा घटनांमध्ये व्यवसाय‍िकांची दुकाने ही सील केली जाते. इथं मात्र तसे झाले नसल्याचे दिसुन आले असुन पोलीसांनी केलेली ही अर्धवट कार्यवाही तर नाही ना ? असा प्रश्न यावल शहरात नागरीकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content