जळगाव, प्रतिनिधी | ना.गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात प्रथमच १ जानेवारी रोजी आले असता त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या ताफ्यातील एका गाडीच्या काचेवर कलर फिल्म लावण्यात आली होती. तसेच या गाडीवर अर्धवट नंबर होता. याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधिक्षांकडे केली होती. यानुसार विक्रम पाटील यांना ४०० रुपयांचा दंड शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आला आहे.
ना. गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जळगाव शहरात १ जानेवारी रोजी प्रथमच आले होते. त्यांचे स्वागतासाठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सहभागी स्कार्पियो गाडीच्या चालकाने समोरील काचेवर ना. पाटील यांचा फोटो लावला होता. यामुळे चालकास गाडी चालवितांना समोरचे काही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता होती. ती शक्यता लक्षात घेऊन माहिती अधिकारक कार्यकर्ते गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांकडे ३ जानेवारी रोजी तक्रार करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. यानुसार पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा यांना योग्य ती कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार पाळधी येथील विक्रम पाटील यांना ४०० रुपयांचा दंड शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आला आहे.