Home राजकीय विनोद तावडेंचे राज यांना प्रत्युत्तर

विनोद तावडेंचे राज यांना प्रत्युत्तर

0
27

मुंबई प्रतिनिधी । कालच्या पाडवा मेळाव्यात भाजपला धारेवर धरणार्‍या राज ठाकरे यांना आज विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर देत हा राज यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला मारला आहे.

काल शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांना पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. या पार्श्‍वभूमिवर, आज विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलतांना राज यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कालच्या भाषणासाठी राज ठाकरेंनी जसे कष्ट घेतले, ते आधी घेतले असते तर आज दुसर्‍यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वत:चे बंद पडलेले इंजिन दुसरीरीकडं जोडून चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका त्यांनी केली. तावडे पुढे म्हणाले की, ज्या संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लुख्खा’ म्हणून हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा मनसेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार असल्याचा टोलादेखील तावडे यांनी मारला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound