रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ लवकरच दिल्लीला जाऊन लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना भेटणार आहे. ही महत्त्वाची भेट राहूल गांधी यांचे निकटवर्ती असलेले एक माजी आमदाराकडून आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण भविष्यात मुक्ताई नगर विधानसभेत राजकीय घडामोडी घडू शकतात.
तराळ हे अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रीय आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेक लोकांची मने जिंकली आहेत आणि समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली माफदाच्या कार्य देखील यशस्वीपणे राबवले आहे.
राहुल गांधी यांच्याशी होणाऱ्या भेटीत माफदा आणि मुक्ताईनगर विधानसभा याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. ही भेट आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या चर्चेमुळे भविष्यकाळात कोणते निर्णय घेण्यात येणार आणि ते मतदारसंघावर कसे परिणाम करतील याची उत्सुकता सध्या सर्वत्र आहे. तराळ यांच्या या दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या भेटीतून काय ठरते आणि त्याचे पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.