विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनीही काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय या दोघांनीही घेतला आहे. काँग्रेसकडून या दोघांनीही आमदारकीचं तिकिट मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.

विनेशची मैत्रीण महिला मल्ल साक्षी मलिक हिने काँग्रेसमध्ये जायचा निर्णय हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असे म्हटले आहे. आमचे आंदोलन महिलांसाठी होतं, महिलांवरच्या अन्यायासाठी होते. मलाही ऑफर होती. पण मी एक चांगली सुरुवात केली आहे, कुस्ती फेडरेशनमध्ये जोपर्यंत अन्याय थांबत नाहीत तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही असे साक्षी मलिकने म्हटले आहे.

मागच्याच महिन्यात पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमुळे विनेश फोगटची चर्चा रंगली होती. विनेश फोगटचं वजन १०० ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळे तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं होतं. तसंच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला मल्लांनी जे आंदोलन केलं त्यातही विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांची चर्चा झाली होती कारण या दोघींनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता. तसंच बजरंग पुनियाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Protected Content