जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची धुळे येथे भूसंपादन विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी आता मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आले आहे. असे आदेश मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी काढले आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची दोन दिवसांपुर्वी धुळे येथील भुसंपादन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्तीचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. विनय गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी म्हणून तीन वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा चांगला परिचित आहे.
यांचीही झाली बदली
अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भाटकर यांची यवतमाळ येथील भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती, धाराशिव येथील विशेष भूसंपादन अधिकारी उदयसिंग भोसले यांची अमरावती उपविभागीय अधिकारीपी नियुक्ती, नागपूर भूसंपादन विभागातील उपजिल्हाधिकारी श्रीराम मुंदडा यांची नागपूर महापालिकेत उपायुक्त पदावर नियुक्ती आणि नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले गणेश राठोड यांची अहमदनगर आणि नाशिक येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काढले आहे.