यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खिरोदा प्र. यावल ! अभिमानाचा क्षण ! गेल्या २ महिन्या आधी रावेर-यावल विधान सभाक्षेत्रात कृतज्ञता संवाद दौरा निमीत्त भेटी गाठी घेत असताना धनंजय चौधरी व सहकाऱ्यांनी गावा-गावातील महिला बचत गट यांच्याशी संवाद साधुन लघु-उद्योग, गृह उद्योग या संदर्भात माहीती व प्रशिक्षण देत होतो. जेणे करुन स्वयंरोजगार निर्माण होऊन अनेक हातांना काम उपलब्ध होतील.
या विनंतीला मान देत खिरोदा गावातीलश्री रेणुका माता महिला बचत गट व त्यांच्या सदस्यानी पुढाकार घेउन मेणबत्ती निर्माण करण्याचा उद्योग हाती घेत सामर्थ्यपणे सुरू केला. आज या उद्योगाचे उद्घाटन करून बचत गटांच्या सदस्यांना त्यांच्या व्यवसायाच्या पुढिल वाटचालीसाठी धनंजयभाऊ चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. बचत गटाच्या अध्यक्षा सौ.कल्पना राजेश चौधरी सचिव चारुलता चंदन पाटील, कल्पना कुंदन पाटील, ललिता विजय चौधरी, सत्यफुला चौधरी, हेमलता चौधरी व अरुण पाटील, सुरेश चौधरी, गिरीशकाका पाटील, कुंदनदादा चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते…