Home क्राईम विजेच्या धक्क्याने अल्पवयीन मुलगा जखमी

विजेच्या धक्क्याने अल्पवयीन मुलगा जखमी


Electric Shock Danger DC Photo 0 0 1 0

जळगाव प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील तरूण शेतात बकर्‍या चारण्यासाठी गेला असता तुटलेल्या विद्युत वाहिनीवर त्याचा पाय पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला आहे.

फेकरी येथील रहिवासी असलेला राज सुरेश सावळे वय-17 हा तरूण शुक्रवारी नेहमीप्रमाणे बकर्‍या चारण्यासाठी शेतात गेला होता. बकर्‍यांच्या मागे धावत असताना अचानक त्याचा पाय तुटून पडलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीवर पडला. त्यामुळे तो 54 टक्के भाजला गेला. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound