नवी दिल्ली वृत्तसंस्था । ब्रिटन सरकारने विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली असून ही मोदी सरकारसाठी मोठी महत्वाची बाब मानली जात आहे.
भारतीय बँकांना तब्बल ९००० कोटी रुपयांना चुना लाऊन ब्रिटनमध्ये पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. ब्रिटनधील गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गृहसचिवांनी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर सही केली आहे. विजय मल्ल्या प्रत्यापर्पणाला आव्हान देऊ शकतो. यासाठी त्याच्याकडे १४ दिवसांची मुदत आहे. त्याला दिलासा न मिळाल्यास मल्ल्याला भारतात आणणे सोपे होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारसाठी ही महत्वाची बाब मानली जात आहे.