गोंविदराजन पद्मनाभन यांना विज्ञानरत्न पुरस्कार

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभन यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त ३३ जणांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देऊन सन्मानित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. आज २२ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. इस्रोच्या चांद्रयान टीमला विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आनंदरामकृष्णन सी, उमेश वार्ष्णेय, भीम सिंग, आदिमूर्ती आदि, सय्यद वाजिह अहमद नक्वी, संजय बिहारी आणि राहुल मुखर्जी यांचा विज्ञान श्री पुरस्कारासाठी निवड झालेल्यांमध्ये समावेश आहे. विज्ञान युवा पुरस्कारासाठी नोंदणीकृत पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. बप्पी पॉल, डॉ. अभिलाष, राधाकृष्णन महालक्ष्मी, पूरबी सैकिया, दिगेंद्रनाथ स्वेन, प्रभू राजगोपाल आणि प्रशांत कुमार यांचा समावेश आहे.

Protected Content