पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नाशिक येथील लिव्हर व प्रत्यारोपणतज्ञ डॉ. शरद देशमुख रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असतील.
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोस्कोपी, एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लिव्हर फॅब्रोस्कॅनच्या सहाय्याने उपचार केले जातात. पोटाच्या सर्व आजारांवर उपचार, दुर्बिणीद्वारे आतड्यांची तपासणी व उपचार, अँसिडिटी, गँस, अपचन, उलटी होणे, रक्ताची उलटी होणे, काळी संडास होणे सांडसातून रक्त जाणे, बध्दकोष्टता, काविळ, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचे खडे, पँनक्रियाटायटिस, (अन्न नलिका,पोट,आतडे,पित्ताशय व स्वादुपिडांचे कँसर), छातीत व पोटात सतत दुखणे, गिळण्यास त्रास होणे-जेवतांना अन्न अडकणे, पोटात पाणी होणे, लिव्हर व पोटाशी संबंधित सर्व आजार दिसून आल्यास रूग्णांनी येत्या मंगळवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आवश्य लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. शरद देशमुख यांच्याकडून उपचार करून घेवून सुविधेचा लाभ घ्यावा असे, विघ्नहर्ता प्रशासनाने केला आहे.