पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रूग्णांना परिपूर्ण वैद्यकीय सेवा प्रदान केली जात आहे.
डॉ. भूषण मगर आणि डॉ. सागर गरूड या ध्येयवेड्या डॉक्टर्सनी पाचोर्यासारख्या ग्रामीण भागातील जनतेला जागतिक स्तरावरील वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे रोपटे लावले असून अल्पावधीतच याचा वटवृक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याआधी पाचोर्यासह परिसरातील जनतेला आधुनीक वैद्यकीय सुविधेसाठी जळगावशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तर गंभीर रूग्णांना औरंगाबाद, नाणिक, पुणे अथवा मुंबईला जावे लागत असे. यातच बर्याच रूग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राणास मुकावे लागत असे. परिसरातील जनतेची हीच समस्या लक्षात घेऊन विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये या हॉस्पीटलने समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांना सातत्याने तत्पर सुविधा प्रदान केली आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अगदी मुंबईसारख्या महानगरांमध्ये असणार्या वैद्यकीय उपचार पध्दती आणि अद्यावत सामग्री ही या हॉस्पीटलमध्ये आहे. आणि गोरगरिबांसाठी सरकारने लागू केलेल्या महात्मा फुले योजनेसह अन्य सर्व शासकीय योजना येथे लागू आहेत. यामुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी हे हॉस्पीटल खर्या अर्थाने विघ्नहर्ता बनल्याचे दिसून येत आहे.
संपर्क : विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, पाचोरा
गुगल मॅप्सवर पहा अचूक लोकेशन :
पहा : विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलबाबतचा व्हिडीओ.