जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नंदूरबार जिल्ह्यातील शहदा येथील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवक महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याहस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष दीपक पुरूषोत्तम पाटील होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य आ. राजेश पाडवी, पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, व्य.प.सदस्य दिलीप पाटील, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, जि.प.नंदूरबारच्या सदस्या जयश्री दीपक पाटील, डॉ.कांतीलाल टाटीया, श्रीमती कमलताई पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग आहेर, प्रभारी कुलसचिव डॉ.किशोर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर व्य.प.सदस्य प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील, प्राचार्य डी.एम.पाटील, उपप्राचार्य इंदिरा पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील उपस्थित होत.
कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ज्ञान आणि क्षमतेला आपल्या गुरूस्थानी मानत आत्मविश्वासाचे बीजारोपण करताना त्याचा अतिरेकी अभिमान बाळगु नका, या महोत्सवातून मैत्री आणि बंधुभावाचा प्रसार करावा, असे आवाहन करत विविध संदर्भ देत व शेरोशायरीचा यथोचित वापर करीत तरूणाईची मने जिंकली. ते म्हणाले की, मैत्री, उल्हास आणि बंधुभावाचा प्रसार हा महोत्सवाचा उद्देश आहे. यातून सांघीक भावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा मंच विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. विद्यापीठाकडून लोकमहोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहे. तरुणांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भारत आता बदलतोय, या देशाकडे बघण्याचा दृष्टीकोन आत जागतिक पातळीवर बदलतोय. बुध्दी, प्रतिभा, नैसर्गिक संसाधने, श्रमसंस्कृती, तरुणपीढी ही आपली सशक्त स्थाने आहेत. मात्र जात, धर्म, प्रदेश, विचारधारा यात हा देश विभागला गेला आहे. तरूणपीढी गोंधळलेली आहे. या पीढीला प्रगल्भ नेतृत्वाची गरज आहे. मात्र त्यासाठी आपल्याला मनसिकता बदलायची गरज आहे. गगनभरारी घेण्यासाठी मनात ओढ असायला हवी. आणि त्यासाठी ज्ञान, क्षमता यांनाच आपले गुरू माना. आत्मविश्वास निर्माण करा. मात्र अभिमान बाळगु नका. असा सल्ला कुलगुरूंनी दिला.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले की, तरुणांनी भविष्य घडवण्यावर भर द्यावा. वेळ पाळा आणि बुध्दीला चालना द्यावी, असे सांगताना त्यांनी पी.के. अण्णा पाटील यांच्या स्मृतीला उजाळा दिला. विद्यापीठातर्फे स्थापन होणाऱ्या अण्णाभाऊ साठे लोककला अकादमीसाठी यापूर्वी पूज्य साने गुरूजी विद्या प्रसाकर संस्थेने जाहीर केलेल्या रकमेत दुप्पटीची भर घालणार असल्याची ग्वाही दीपक पाटील यांनी यावेळी दिली.
आमदार राजेश पाडवी यांनी कोरोनानंतर हा युवक महोत्सव उत्साहात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून कलावंतांना शुभेच्छा दिल्या. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी विपरित परिस्थितीत झुंजणाऱ्या तरुणाईचा अविष्कार या महोत्सवात दिसणार असल्याचे सांगुण विद्यापीठाकडून आदिवासी अकादमी, सिलेज प्रकल्प, मोलगी येथील विद्यापीठ संचलित महाविद्यालय यातून केल्या जात असलेल्या विकासाची माहिती दिली. महोत्सवातून उत्तम कलावंत आणि उत्तम नागरिक घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
महोत्सवाचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी या महोत्सवातील कलावंतांनी खिलाडूवृत्ती बाळगावी अशी अपेक्षा बाळगुन शुभेच्छा दिल्या. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठ विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सविस्तर भूमिका मांडली. १०७ महाविद्यालयातील १०८८ कलावंतांनी भाग घेतला असल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रारंभी दिव्या पाटील या विद्यार्थिनीने सहभागी विद्यार्थ्यांना महोत्सवाची प्रतिज्ञा दिली. यावेळी एव्हरेस्ट शिखर करणाऱ्या पिंपळनेर महाविद्यालयाची विद्यार्थिनी चंद्रकला गावित हिचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटना पुर्वी विद्यापीठ ध्वज व युवारंग महोत्सव ध्वजाचे आरोहण कुलगुरूंच्या हस्ते झाले. त्यानंतर पी.के.पाटील, बहिणाबाई चौधरी व नटराजाच्या प्रतिमांना मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण केले व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय शर्मा यांनी केले. युवारंग समन्वयक डॉ.ईश्वर जाधव पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास युवारंग आयोजन समितीचे युवारंग महोत्सव आयोजन समिती सदस्य प्राचार्य अे.टी.पाटील, अधिसभा सदस्य प्राचार्य लता मोरे, डॉ. अनिल पाटील, प्रा.प्रकाश अहिरराव, प्रा.ई.जी.नेहते, डॉ.गौतम कुवर, डॉ.सुनील गोसावी, डॉ.के.जी.कोल्हे, अमोल मराठे, दिनेश नाईक, डॉ.दिनेश खरात, नितीन ठाकूर, तसेच डॉ.राम पेटारे, प्रा.आर.झेड सैय्यद, डॉ.सुनील कुवर, श्रीराम दाऊतखाने, प्रा.सोनाली पाटील, डॉ.मालीनी आढाव, प्रा.एम.के.पाटील, डॉ.अनिल सांळुखे, डॉ.पवन पाटील, डॉ.हसीम शेख, डॉ.संजू पाटील, तसेच प्रा.डी.एल तोरवणे, प्राचार्य राजू अहिरे, प्राचार्य शांताराम बडगुजर, प्राचार्य डी.एस.सोनवणे, प्रा.डॉ.पी.एस.लोहार, प्रा.डॉ.एस.आर.मगरे, यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.