रावेर प्रतिनिधी । येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून याबाबत रावेर येथील पत्रकारांना नेमके काय वाटते ? याचा चर्चासत्रातून घेतलेला हा वेध.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत निश्चित झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळच नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजतर्फे विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचे मत आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर, रावेर शहरातील ख्यातप्राप्त पत्रकारांचे मत आपल्याला सादर करत आहोत.
या चर्चासत्रात वासुदेव नरवाडे ( प्रतिनिधी दिव्य मराठी ), देवलाल पाटील ( प्रतिनिधी- तरूण भारत )
कृष्णा पाटील ( संपादक- कृषीसेवक), प्रदीप वैद्य ( प्रतिनिधी- सकाळ), प्रकाश पाटील ( प्रतिनिधी पुण्यनगरी), सतीश नाईक (प्रतिनिधी सामना) व जयंत भागवत (दैनिक भास्कर) यांनी सहभाग घेतला. तर या सर्वांना बोलते केलेय जनशक्तिचे तालुका प्रतिनिधी शालीक महाजन यांनी.
पहा : लोकसभा निवडणुकीबाबत रावेर येथील पत्रकारांचे चर्चासत्र.