जळगाव प्रतिनिधी । आयएमआर महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या 19 वर्षीय विद्यार्थाने रूमवर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली असून रुम पार्टनर खबरीवरून रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, तेजस नंदकिशोर बारी (वय-19) रा. शेंदुर्णी ता. जामनेर हा जळगावातील आयएमआर महाविद्यालयात बीबीएमच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. त्याच्यासोबत मयत तेजस बारी, दिपक नंदु महाजन आणि सौरभ नंदकिशोर राजपूत या तिघांनी मिळून मु.जे. महाविद्यालय परीसरातील पद्मालय हाईट्स येथे रूम करून राहत होते. यातील दिपक महाजन यांचे रेडीमेड कपड्याचे दुकानावर कामाला आहे. तर सौरभ राजपूत हा रायसोनी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 29 रोजी रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान तेजसने रूमवर कोणीही नसतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार दिपक महाजन यांच्या लक्षात आला. अद्यापपर्यंत आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
जेवनासाठी दिला होता नकार
सोमवार 29 एप्रिल रोजी 9.30 वाजता दिपक महाजन हा कामावरून घरी आला. त्यावेळी सौरभ राजपूत हा वर्गातील दुसऱ्या मित्राकडे अभ्यासासाठी गेल्याने रूमवर तेजस हा रूमवर एकटाच बसलेला होता. सर्वांची मेस असल्यामुळे दिपकने तेजसला मेसवर जेवणासाठी विचारले. त्यावर मला भुक नसल्याचे सांगत दिपक जेवणासाठी निघून गेला. रात्री 11.30 वाजता जेवण करून दिपक महाजन बाजूच्या रूममधील मित्रांसोबत आला असता रूमचा दरवाजा आतून बंद केलेला आढळला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.