जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत 30 वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीला आज दुपारी 12.15 वाजेदरम्यान अटक करण्यात आली आहे. अक्षय गंगाधर जोशी वय-30 रा. देवीदास कॉलनी जळगाव असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे दोन वर्षांपुर्वी आकस्मात मृत्यू झालेल्या 30 वर्षीय पिडीत विधवा महिला आणि तहसील कार्यालयासमोर एका दुकानावर काम करणारा अक्षय यांची गेल्या दोन वर्षांपासून मैत्री होती. अक्षय जोशी याने पिडीत महिलेचा पती मयत झाल्यानंतर जवळीक साधला. दोघांचे प्रेमसंबंध झाले. पिडीत महिलेला एक मुलगी आणि मुलगा असून तुला सुखात देवीन आणि तुझ्याशी लग्न करेन असे सांगून पिडीतेच्या घरी शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर अक्षय जोशी आपल्याला फसवत असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने त्याच्याशी बोलणे बंद केले. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अक्षय पिडीतेच्या घरी येवून पुन्हा बळजबरीकरून बलात्कार केला. त्यानंतर फिर्यादीची दुचाकी घेवून पळून गेला होता याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दुपारी 12.15 वाजता आरोपी अक्षय जोशी याला अटक केली आहे.