चाळीसगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिनानिमित्ताने आज (दि.10) रोजी मालेगाव रोड स्थित राष्ट्रवादी कार्यालय येथे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० मिनिटांनी झेंडा वंदन करून साजरा करण्यात आला.
यावेळी देशमुख म्हणाले की, पराभवाने खचून न जाता, आता पुन्हा आपण सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू, मागील आमदारकीच्या काळात केलेली जनतेची कामे जनतेसमोर ठेवू, सर्वांच्या सोबतीने आणि सहकार्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झेंडा फडकविणारच, तसेच जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद पाटील आणि नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. तर जि.प. सदस्य भूषण पाटील यांनी आभार मानले. तसेच यावेळी, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक प्रमोद पाटील, शिवाजी आमले, रतन साळुंखे, युवराज सोनवणे, छोटू देशमुख, डी.ओ. पाटील, नरेश साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक रामचंद जाधव, नगरसेवक रविंद्र चौधरी, नगरसेवक दीपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर ठाकरे, अजय आव्हाड, जि.प.सदस्य तथा युवक तालुकाध्यक्ष भूषण पाटील, पंचायत समिती गटनेते अजय पाटील, बाजीराव दौंड, पंचायत समिती सदस्य शिवाजी सोनवणे, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्या पाटील, योगेश पाटील, अभिजित शितोळे, राजीव जाट, बाळासाहेब खत्ती, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अल्ताफ शेख, युवक शहर उपाध्यक्ष शुभम पवार, युवक तालूका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष यज्ञेश बाविस्कर, विद्यार्थी शहराध्यक्ष शिवसागर पाटील, युवक शहर संघटक गुंजन मोटे, युवक जिल्हा संघटक निखिल देशमुख, रविंद्र एरंडे, गोकुळ पाटील, दीपक शिंदे, आकाश पोळ, श्रीकांत राजपूत, सूरज शर्मा, कौस्तुभ राजपूत, अनिकेत चव्हाण, उल्केश पाटील, नितीन पवार आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते