Home राजकीय विधानसभेच्या जागावाटप चर्चला पूर्णविराम; उद्धव ठाकरे

विधानसभेच्या जागावाटप चर्चला पूर्णविराम; उद्धव ठाकरे

0
48

 

uddhav thackera 11

 

कोल्हापूर प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूरात आगमन होताच, शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. युती मजबूत आहे, आमचं ठरलंय, असे सांगत विधानसभेच्या जागावाटपावरून होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडून पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आल्याने शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा झडत होत्या. यावर उद्धव ठाकरेंनी युती मजबूत असल्याचे स्पष्ट केले. आमची कोणतीच नाराजी नाही. पण इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. आमचं ठरलं आहे, असे सांगत त्यांनी जागावाटपावरूनही काही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातून दोन खासदार देणाऱ्या जनतेला त्यांनी मानाचा मुजरा केला. त्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound