जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या टक्केवारीची अचूक माहिती जाहीर केली आहे. यात जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात काल सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात आले. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी त्ुारळक लोक असले तरी दुपारपासून गर्दी झाली. तर सायंकाळी बऱ्याच मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या. परिणामी बऱ्याच केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान चालले. यामुळे प्रशासनाला अचूक माहिती देता आली नाही.
या पार्श्वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा मतदानाची अचूक आकडेवारी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
चोपडा : 66.57 टक्के
रावेर : 73.84 टक्के
भुसावळ : 57.75 टक्के
जळगाव शहर : 54.95 टक्के
जळगाव ग्रामीण : 69.33 टक्के
अमळनेर : 65.61 टक्के
एरंडोल : 68.86 टक्के
चाळीसगाव : 61.67 टक्के
पाचोरा : 68 : 32 टक्के
जामनेर : 70.55 टक्के
मुक्ताईनगर : 70.71 टक्के
यानुसार मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने माहिती कार्यालयाच्या माध्यमातून जारी केली आहे. आता दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून यात नेमके कोण बाजी मारणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.