Home क्राईम ‘जैश’कडून ‘सुसाइड बॉम्बर’च्या छायाचित्रसह व्हिडिओ प्रसारित

‘जैश’कडून ‘सुसाइड बॉम्बर’च्या छायाचित्रसह व्हिडिओ प्रसारित



श्रीनगर (वृत्तसेवा) पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने दहशतवाद्याच्या छायाचित्रसह एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओत आपण गेल्यावर्षी जैश-ए-मोहम्मद संघटनेत दाखल झालो आणि वर्षभरानंतर आपल्याला या हल्ल्याची मोहीम देण्यात आली. जेव्हा हा व्हिडिओ रिलीज होईल तेव्हा मी जन्नत (स्वर्गात) असेन, असे आदिल अहमद दार नामक दहशतवादी व्हिडिओत म्हणतोय.

आदिलने या दहशतवाद्याने आजचा आत्मघातकी हल्ला केला होता. आदिल हा पुलवामा येथील काकापोरा भागातील रहिवासी आहे. हल्ल्यानंतर लगेचच जैशकडून आदिल अहमद दार ऊर्फ गुंडीबागचा कमांडो वकास याचा एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. हा व्हिडिओ दारने केलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या काही वेळ आधीचा आहे. यात तो काश्मीरी मुस्लिमांवरील अत्याचाराबाबत बोलत आहे. जैशच्या बॅनरसमोर उभा राहून हातात रायफल घेतलेल्या पोझमध्ये आदिलने हे व्हिडिओ शूट केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound