सांगोलजवळ वाहनाला भीषण अपघात ; ५ वारकरी जागीच ठार

Accident

 

सोलापूर (वृत्तसंस्था) पंढरपूरला निघालेल्या एका टेम्पोला सांगोलजवळ झालेल्या भीषण अपघतात झालाय. या अपघातात ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, सर्व वारकरी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते.

 

अपघातग्रस्त टेम्पो बेळगावहून पंढरपूरकडे निघाला होता. या टेम्पोने विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. दरम्यान, अपघातग्रस्त वारकरी बेळगावातील मंडोळी व हंगरगा गावचे रहिवासी असल्यामुळे दोघं गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

Protected Content