एरंडोल तालुक्यात वेदिका पाठक प्रथम

3e5ad522 cb8d 4833 a114 081a86615d3e

 

एरंडोल (प्रतिनिधी) येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाची विद्यार्थिनी वेदिका परेश पाठक 91 .20 टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम आली आहे. तर दर्शन शाम पाटील हा विद्यार्थी 90.80 टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वितीय व कविता समाधान पाटील 90.40 टक्के गुण मिळवुन तालुक्यात तृतीय आली आहे.

 

दहावीच्या परीक्षेत काबरे विद्यालयाचे विद्यार्थी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने तालुक्यात उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांचेसह संस्थेच्या पदाधिका-यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 

एरंडोल रा.ति.काबरे विद्यालय

रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाचा निकाल 85.24 टक्के लागला.वेदिका परेश पाठक हि विद्यार्थिनी 91.20 टक्के गुण मिळवुन विद्यालयातून तसेच तालुक्यातुन प्रथम आली तर दर्शन शाम पाटील हा 90.80 टक्के गुण मिळवुन विद्यालय व तालुक्यातून द्वितीय आला तर कविता समाधान पाटील हि विद्यार्थिनी 90.40 टक्के गुण मिळवुन विद्यालय व तालुक्यातून तृतीय आली.

 

एरंडोल अॅग्लो उर्दू हायस्कुल

येथील अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट संचलित अॅग्लो उर्दू हायस्कुलचा निकाल 82.19 टक्के लागला.महेकनाज अब्दुल वाजीद मुजावर हि विद्यार्थिनी 84.60 टक्के गुण मिळवुन प्रथम तर खाटिक मो.मुदस्सर जावेद अहम हा 80.20 टक्के गुण मिळवुन द्वितीय आला.संस्थेचे अध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम,सचिव शकीलोद्दिन शेख,उपाध्यक्ष हसन शेठ,मुख्याध्यापक अयाजोद्दिन शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

एरंडोल न्यु इंग्लिश मेडियम स्कुल

येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यु इंग्लिश मेडियम स्कुलचा निकाल 95.23 टक्के लागला.अथर्व संजय पाटील हा 86.60 टक्के गुण मिळवुन प्रथम तर इशा विनायक ठाकुर व अभय युवराज पाटील 85.20 टक्के गुण मिळवुन द्वितीय तर अंजली कैलास बिर्ला 83.40 टक्के गुण मिळवुन तृतीय आले.प्राचार्य सरला कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

एरंडोल माध्यमिक विद्यामंदिर

येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल 72 टक्के लागला.अश्विनी चुडामण पाटील हि विद्यार्थिनी 79.40 टक्के गुण मिळवुन प्रथम आली तर शेख तन्वीर शेख शरीफ हा विद्यार्थी 78 टक्के गुण मिळवुन द्वितीय आला.तर वैशाली मोतीलाल खैरनार 74 टक्के गुण मिळवुन तृतीय आली.

 

भातखेडे माध्यमिक विद्यालय

तालुक्यातील भातखेडे येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 92.10 टक्के लागला.सृष्टी अभिमान पाटील हि विद्यार्थिनी 90 टक्के गुण मिळवुन प्रथम आली तर भाग्यश्री अरुण पाटील 86.80 टक्के गुण मिळवुन द्वितीय तर मोहिनी भारत पाटील हि विद्यार्थिनी 84.80 टक्के गुण मिळवुन तृतीय आली.

 

विखरण सरस्वती माध्यमिक विद्यालय

तालुक्यातील विखरण येथील सरस्वती विद्याप्रसारक मंडळ संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल 86.74 टक्के लागला.विद्यालयातून जागृती रवींद्र महाजन 88.80 टक्के गुण मिळवुन प्रथम तर चांदणी रावसाहेब पाटील हि विद्यार्थिनी 88.20 टक्के गुण मिळवुन द्वितीय तर क्रांती दिनेश पाटील हि विद्यार्थिनी 86.60 टक्के गुण मिळवुन तृतीय आली.संस्थेचे अध्यक्ष प्रदीप देसले,सचिव डॉ.राजेंद्र देसले,मुख्याध्यापक बी.वाय.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.भातखेडे व विखरण येथे दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीनी बाजी मारली आहे.

Add Comment

Protected Content