पाचोरा (प्रतिनिधी) वेदिकस इंटरनॅशनलतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. त्यात आशिर्वाद कंप्यूटर्स संचलित एम.एस. जिनीअस अबॅकसचे ४५ विद्यार्थी पात्र ठरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून एकुण ३०० विद्यार्थी यास्पर्धेसाठी पात्र ठरले होते. एकुण नऊ गटांत सदर स्पर्धा घेण्यात आली. सहभागी झालेल्या ३०० विद्यार्थ्यांमधुन विविध गटांतून २१ विद्यार्थ्यानी पहिला क्रमांक पटकावून विजयीश्री प्राप्त केली.
विजेत्यांमध्ये लहान गटात देवश्री भुषण मगर, भार्गवी विजय जाधव, भावेश पाटील, अनुष्का पाटील, पर्व पवन अग्रवाल, श्रावणी राकेश पाटील, प्रणव अग्रवाल, आदिती अलाहित, आदिती सिनकर, देवांग राजेंद्र पाटील, आर्या अतुल शिरसमणे, तनिशा विशाल पाटील, सिद्धेश सचिन बाहेती, तनुश न्याती, राजेश पाटील, कल्पेश पाटील, विराज पवनसिंग पाटील, आशी अनुप अग्रवाल, सात्विक अतुल शिरसमणे हे विजेते ठरले. तर अर्जुन सूर्यवंशी, उत्कर्ष तावडे, अंशुल पाटील, भव्य गहरवाल, प्रणव भोसले, आयुष देशमुख, चैताली पाटील, नयन पाटील, तेजस्विनी झेरवाल, तेजासाई गणेश, तन्मय अग्रवाल, श्रावणी अलाहित, उत्कर्षा सूर्यवंशी, कौस्तुभ पाटील, निशांत पाटील, प्रणीता पाटील, अद्वैत वरलानी, आर्यन महाजन, नंदिनी हिरे, धृव शिंदे, पियुष अमृतकर, राधिका बाहेती, सोनाक्षी राऊळ, श्रुती कुमावत, प्रिया नंदेवर, सिद्धांत पाटील यांनी स्पर्धा गाजवली. सदर विद्यार्थ्यांना सौ.मंजुश्री शिरसमणे, अतुल शिरसमणे, यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी वेदिकसचे एम.डी. आशिष पाटील आणि मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांमधून डॉ.प्रिती मगर, सौ.ज्योती शिंदे, सौ.साक्षी तावडे, सौ.मंजु ढाकरे, सौ.सविता पाटील, सौ.ज्योती पाटील, सौ. राखी गहरवाल यांचेही स्पर्धेसाठी सहकार्य मिळाले. स्पर्धा यशस्वितेसाठी अजिंक्य कासार, मयूर कोळ्पकर, योगेश मोकळ, संदीप नलावडे, जीवन पाटील व लक्ष्मी हिरे यांनी परिश्रम घेतले.