नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या ऑटो-एक्सपो मध्ये वेव्ह मोबॅलिटी कंपनीने वेव्ह इव्हा ही देशातील पहिलीची सोलर एनजवर चालणारी कार लाँच केली आहे. याचे मूल्य एंट्री लेव्हलच्या अन्य मॉडेलप्रमाणेच असल्याने याला ग्राहकांनी पसंती मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी पुणे-आधारित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी वेव मोबिलिटी (Vayve Mobility) ने देशातील पहिली सोलर पावर्ड इलेक्ट्रिक कार ‘Vayve Eva’ अधिकृतरीत्या लाँच केली आहे. अवघ्या ३.२५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह ही कार बाजारात उपलब्ध आहे.
खास डिझाईन
वेव मोबिलिटीने सांगितले की, Vayve Eva ही कार शहरी भागातील दैनंदिन प्रवासासाठी डिझाईन करण्यात आली आहे. केवळ ३ मीटर लांब असलेल्या या कारमध्ये चालक आणि एका प्रौढासह एका लहान मुलासाठी जागा उपलब्ध आहे. या कारचे डिझाईन आणि तंत्रज्ञान यामुळे ती रोजच्या प्रवासाचा परिपूर्ण पर्याय ठरणार आहे. कारमध्ये सनरूफऐवजी सोलर पॅनेल बसवले आहे.
वेरिएंट आणि किमती:
वेरिएंट किंमत (रुपयांत एक्स-शोरूम)
Nova ३.२५ लाख
Stella ३.९९ लाख
Vega ४.४९ लाख
Vayve Eva: लुक आणि डिझाईन
Vayve Eva मध्ये चालकासाठी एक सिंगल सीट दिली आहे आणि मागील सीट थोडी रुंद आहे, जिथे एक प्रौढ आणि लहान मूल बसू शकते. ड्रायव्हिंग सीट ६-वे अॅडजस्टेबल असून, चालकाच्या सोयीसाठी दरवाज्याला फोल्डिंग ट्रे देखील देण्यात आला आहे. या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफसह आधुनिक आणि आरामदायक डिझाईन आहे.
कारची साईझ:
लांबी: ३०६० मिमी
रुंदी: ११५० मिमी
उंची: १५९० मिमी
ग्राउंड क्लिअरन्स: १७० मिमी
टर्निंग रेडियस: ३.९ मीटर
टॉप स्पीड: ७० किमी प्रतितास
फ्रंटमध्ये डिस्क ब्रेक्स आणि मागील चाकांसाठी ड्रम ब्रेक्ससह ही कार तयार करण्यात आली आहे.
इंटीरियरची खासियत
कार लहान असली तरी, आतून प्रशस्त वाटेल असे डिझाईन करण्यात आले आहे. एसी, ऍपल कार प्ले, आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिविटी या वैशिष्ट्यांसह ही कार ग्राहकांना स्मार्ट अनुभव देईल. पॅनोरामिक सनरूफमुळे कारचे इंटीरियर अधिक स्पेशियस वाटते.
ड्रायव्हिंग रेंज आणि बॅटरी तंत्रज्ञान
Vayve Eva मध्ये १४kWh क्षमता असलेली लिथियम-आयन बॅटरी आहे. लिक्विड-कूल्ड इलेक्ट्रिक मोटर १२kW पॉवर आणि ४०Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, ही कार सिंगल चार्जवर २५० किमी पर्यंतची रेंज देते. रिजेनरेटिंग ब्रेकिंग सिस्टीममुळे बॅटरीचे कार्यक्षमता वाढते.
चार्जिंग आणि वजन क्षमता
सामान्य चार्जिंग: १५A सॉकेटद्वारे ४ तासांत फुल चार्ज
फास्ट चार्जिंग: CCS2 DC फास्ट चार्जरद्वारे केवळ ४५ मिनिटांत फुल चार्ज
कारचे वजन: ८०० किलो
लोड क्षमता: २५० किलो
सोलर कारचे भवितव्य
Vayve Eva ही कार भारताच्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला नवीन दिशा देणारी ठरेल. कमी किमती, अनोख्या डिझाईन, आणि पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांमुळे शहरी ग्राहकांमध्ये या कारला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल, असा कंपनीचा अंदाज आहे.