
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा. तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि अॅड.डॉ.नि.तु. पाटील यांनी राबविलेल्या मतदान जनजागृती अभियानाची प्रदेश स्तरावर दखल घेण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी चे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी एक पत्र पाठवत डॉ.पाटील दाम्पत्याचा कौतुक केले आहे.
वासुदेव नेत्रालयात चालू असलेले मतदार जनजागृती अभियानात मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्रतपासाणी फी मध्ये ५० टक्के सवलत आठवडाभर दिली जात होती. सदर अभियान दि.२३ ते ३० एप्रिल वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालले .पुढे त्यात म्हटले आहे की,ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे आयोगीत सामाजिक,शैक्षणिक,अध्यात्मिक आदी उपक्रम राबवत असून हा गौरव सच्या सामाजिक कार्यकर्ताचा गौरव आहे. राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्याने आयोजित केलेला हा उपक्रम इतरांसाठी पथदर्शी आहे. निव्वळ पैसांच्या मागे न धावता विविध सामाजिक उपक्रम राबयून गावपातळीवर वासुदेव नेत्रालय आपला ठसा उमटवून आहे.
दरम्यान, वासुदेव नेत्रालय वरणगावला सुरु झाल्यापासून विविध उपक्रमातुन जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज ह्या कार्याची प्रदेश पातळीवरून दखल घेतल्यामुळे आमचा आणि आमच्या सहकारी वर्गाला अभिमानास्पद बाब आहे,त्याचबरोबर जबाबदारी वाढल्याची जाणीव होत असल्याची प्रतिक्रिया, डॉ.नितु पाटील यांनी दिली आहे.