जळगाव प्रतिनिधी | जिल्हा दौर्यावर आलेले युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांची आज मेहरूणमध्ये वही तुला करण्यात आली असून यातून जमा करण्यात आलेल्या वह्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, वरूण सरदेसाई हे आज एक दिवसाच्या जळगाव जिल्हा दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत महापौरांनी मेहरूण तलाव परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात त्यांची वही तुला करण्यात आली. यातून जमा करण्यात आलेल्या वह्या कोकण आणि पश्चीम महाराष्ट्रातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, विराज कावडिया, महिला महानगराध्यक्षा शोभाताई चौधरी, सरीत माळी-कोल्हे आदींची उपस्थिती होती.