वर्षा पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात

amalner 2

अमळनेर (प्रतिनिधी) अ.शि.प्र.मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कुल अमळनेर या शाळेतील जेष्ठ शिक्षीका वर्षा पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता डी.बोरसे यांनी केले.

 

शालेय कार्यक्रमात पहिल्या सत्रात शैलेंद्र साळुंखे व आर.एस.सोनवणे यांनी वर्षा पाटील यांचा सेवेत असतांनाच्या आठवणी, अध्यापनात असलेले नवीन तंत्रज्ञानाचा वापर अवगत असणे या विषयी मनोगत व्यक्त केले. दुपार सत्रात साने गुरुजी नुतन माध्म.विद्यालय ,साने गुरुजी कन्या हायस्कुल,साने गुरुजी प्राथमिक विद्यालय अमळनेर येथील संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे,मुख्याध्यापक एस.डी.देशमुख ,अनिता बोरसे, मेघा देवरे.बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प व शाल श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप बी.घोरपडे, प्रमुख पाहुणे प्रतिभाताई शिंदे, प्रा.सराफ सर, एच.टी.माळी,प्रा.अशोक पवार,उदयबापू पाटील ,विनोद देशमुख ,हेमकांत पाटील ,डाँ. प्राचार्य शेख सर यांनी माता सावित्रीबाई व साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. प्रास्ताविक अनिता बोरसे यांनी केले. मुख्याध्यापक एस.डी.देशमुख व जे.एस.पाटील, विलास चौधरी, शिक्षण क्षेत्रातला असलेले प्रसंग ,प्रेमळ स्वभाव मत व्यक्त करुन उर्वरीत आयुष्य निरोगी व दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आप्तनातेवाईक यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. प्रतिभाताई शिंदे, अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी वर्षा पाटील यांच्याबद्दल शाळेतील आठवणी व्यक्त केल्या. त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. सदर प्रसंगी शाळेचे संचालक मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन मनिष उघडे तर आभार विद्या दामोदर पाटील यांनी मानले.

Add Comment

Protected Content