अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जानवे येथील भटू दौलत कापडणे हे आदर्श विद्यालय अमळगांव येथे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. ते 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज दि 31रोजी सेवा निवृत्त झाले.
भटू कापडणे यांचे शिक्षण जळगांव येथील नूतन मराठा महाविद्यालयातून एम.ए. राज्यशास्र ची पदवी घेतलेली. दि 14 जून 1982 रोजी मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज लि. जळगांव संचालित किसान विद्यालय जानवे येथे प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी सामनेर, चिंचोली, कळमसरे, जळगांव व अमळगाव येथे सेवा बजावली. त्यांच्या प्रदीर्घ सेवा बजावल्या बद्दल संस्थेच्या वतीने व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर व कर्मचारी आदिनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.