सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रावेर तालुका आणि युवक तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांची सुरुवात भव्य रक्तदान शिबिराने झाली. या शिबिरात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
रक्तदान शिबिरानंतर, जिल्हा परिषद शाळा, सावखेडा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. तसेच, खिरोदा जवळील बारी गावात गरजू विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या पोटाची भूक भागली आणि त्यांना आधार मिळाला.

या सामाजिक उपक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, सावदा नगरीच्या माजी नगरसेविका रेखा राजेश वानखेडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष कुर्बान शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे यांच्यासह गौरव वानखेडे, सिमरन वानखेडे, मयूर कवडकर, मोंटू पाचरवाल, चेतन बखाल, जहांगीर तडवी आणि अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांमधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. उपमुख्यमंत्र्यांच्या सामाजिक विचारांचे अनुकरण करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने समाजात एक सकारात्मक संदेश पोहोचवला असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



