फैजपूर (प्रतिनिधी) आ. हरीभाऊ जावळे यांच्या विशेष प्रयत्नांनी रावेर मतदार संघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या येणाऱ्या रस्त्यांच्या भूमिपूजनचा कार्यक्रम उद्या (सोमवार) सकाळी होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून हा निधी मंजूर झाला आहे. त्यात सावखेडे-परसाडे-डोंगरकठोरा-भालोद-बामणोद-विरोदा-फैजपूर रस्ता प्रजीमा-१३ रस्त्याचे डांबरीकरण करणे- २ कोटी ८५ लक्ष (रस्त्याचे भाग- मोहराळे ते वड्री, डोंगर कठोरा ते सांगवी फाटा, विरोदा ते पिंपरूड फाटा), अट्रावल-भालोद-आमोदे रस्ता प्रजीमा-११ रस्त्याची सुधारणा करणे- १ कोटी २७ लक्ष, (रस्त्याचे भाग- भालोद गावातील लांबी कॉंक्रीटीकरण (आठवडे बाजार ते वाणी गल्ली ते कॉलेज पर्यंत) व आमोदा गावातील रस्ता कॉंक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे), टाकरखेडा-चिखली-भालोद-हिंगोणा-न्हावी रस्ता प्रजीमा-५८ ची सुधारणा करणे ता.यावल- १ कोटी ८१ लक्ष, (रस्त्याचे भाग- बोरावल ते वाघळूद, चिखली ते भालोद रस्त्याचे डांबरीकरण तसेच भालोद गावातील लांबी काँक्रीटीकरण करणे.) या कार्यक्रमांचे भुमिपूजन होत आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहे.