धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक एड्स दिना निमित्त TAKE THE RIGHTS PATH ( मार्ग हककाचा, सन्मानाचा ! ) या प्रमुख ध्येय अनुसरून ग्रामीण रुग्णालय धरणगाव व पी. आर. हायस्कूल धरणगाव ,प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर वन स्टॉप विभाग,जळगाव, साने गुरुजी फाउंडेशन संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही जनजागृती पर रॅली , प्रतिज्ञा व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समस्त ग्रामीण रुग्णालय डॉक्टरस, कर्मचारी शालेय शिक्षक व विद्यार्थी जनसामान्य कार्य करते त्यांच्या उपस्थितीत जागतिक एड्स दिनाची जाहिर प्रतिज्ञा घेण्यात येवून घोषणांच्या प्रचाराने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.


दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींच्या प्रति आपुलकी दाखवणे कलंक व भेदभाव नष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. या वर्षीच्या एड्स दिनाचे ‘TAKE THE RIGHTS PATH ( मार्ग हककाचा, सन्मानाचा ! ) हे ब्रीदवाक्य आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय जळगाव या विभागातून जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाचा गाडा हाकला जातो.
सरकारी दवाखान्यांमध्ये आयसीटीसी या केंद्रामध्ये मोफत एचआयव्ही समुद्रेशन व चाचणी केली जाते. तर एआरटी केंद्रांमधून एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दर महिन्याला मोफत औषध पुरवठा व उपचार केले जातात. जिल्ह्यामध्ये २3 आयसीटीसी केंद्रे व 2 एआरटी केंद्रे कार्यान्वित आहेत.एड्स नियंत्रणाच्या तिसऱ्या टप्प्यात आयसीटीसी केंद्रावर भर दिला गेला. एचआयव्ही संसर्गित सामान्य रुग्णांचे २००७ मध्ये दर हजारी १०.७ % प्रमाण होते ते सध्या ०.५ % इथपर्यंत आलेले आहे. तर गरोदर मातांमध्ये हे प्रमाण दर हजारी ०.४% वरून ०.०५% इतके कमी झालेले आहे.सद्यस्थितीत नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी कमी झालेली आहे हे अशादायक आहे. ही आकडेवारी कमी करण्यासाठी समुपदेशन व चाचणी केंद्र,एआरटी केंद्र,एड्स नियंत्रण पथक रक्तपेढी, डी.एस.आर.सी विभाग या विभागांचा महत्त्वाचा वाटा आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.
सदर कार्यक्रम वैद्यकिय अधिक्षक डॉ मनोज पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय अधिकारी, डॉ. दिपक साळुंखे , डॉ. मयुर जैन,डॉ. एन. डी.महाजन डॉ. मोसिन शाह, डॉ. हर्ष चौधरी, डॉ. जितेंद्र चव्हाण , डॉ.अभिषेक बोरसे,पी आर हायस्कूल मुख्याध्यापक संजय कुमार सोनवणे, सहशिक्षक डी .एस .पाटील, वाई . ए. पाटील , आयसीटीसी समुपदेशक डी.जी. शिंपी , समुपदेशक गणेश कुंभार,प्रयोगशाळा तंत्रज्ञ आर. ए. काकडे,प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर वन स्टॉप विभाग अंतर्गत प्रकल्प समन्वयक अल्केश वाघरे व समुपदेशक मोहन महाजन, क्षयरोग परिवेक्षक नंदू चौधरी, फार्मसी दिनेश बडगुजर, विजय कंखरे, परिसेविका एन. वी. दोर्कर सिस्टर , डिंपल पाटील, वैष्णवी हिवराळे,भाऊसाहेब शुभम बोदळे, अविनाश चौधरी , संजय वाणी, प्रदीप येवले,दिनेश पाटील, कुणाल चौधरी , नामदेव मराठे, महेंद्र सपकाळे समस्त सहकार यांच्या उपस्थितीने कार्यक्रम संपन्न करण्यात आला.


